प्रत्येक बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणात तात्काळ एफआयआर नोंदवा

नवी दिल्लीत : बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा. हा आदेश प्रत्येक व्यक्तीला लागू होतो, मग त्या व्यक्तीचे वय किंवा लिंग काहीही असो, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी करताना तीव्र नाराजी व्यक्त केली. काही राज्यांच्या मते व्यक्ती या शब्दाचा अर्थ केवळ मुले असा होतो. त्यात प्रौढ व्यक्तींचा समावेश होत नाही, असा गैरसमज पसरवला जात असल्याचे समोर आल्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

हा काही राज्यांनी जाणीवपूर्वक पसरवलेला चुकीचा भ्रम आहे. आमच्या आधीच्या आदेशाची भाषा अत्यंत स्पष्ट आणि संशयमुक्त आहे. व्यक्ती या शब्दाचा अर्थ वय किंवा लिंगाचा विचार न करता प्रत्येक नागरिक असाच होतो, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने खडसावले. तसेच ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी न्यायालयाच्या या आदेशाचे पालन केलेले नाही, त्यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना ५ सप्टेंबर रोजी होणा-या पुढील सुनावणीदरम्यान न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमाननेची कारवाई का केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या सुनावणीत काय झाले?
याआधी २२ मे रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात ४७ हजार मुले अजूनही बेपत्ता असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. बेपत्ता होण्याची माहिती मिळताच कोणतीही प्राथमिक चौकशी न करता किंवा पालकांवर न सोपवता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील अपहरण आणि मानवी तस्करीशी संबंधित कलमांखाली तात्काळ एफआयआर नोंदवला पाहिजे. कोणतेही मूल बेपत्ता झाल्यास सुरुवातीपासूनच ते प्रकरण अपहरण किंवा पळवून नेणे असे मानून अत्यंत गंभीरतेने तपास केला जावा. शोध लागलेल्या किंवा सुटका केलेल्या बालकांना २४ तासांच्या आत त्यांच्या कुटुंबाकडे सोपवले पाहिजे. गृह मंत्रालयाने देशातील प्रत्येक पोलीस स्टेशनला जोडणारी एक केंद्रीय प्रणाली/पोर्टल तयार करावे, ज्यावर मानवी तस्करी, बेपत्ता मुले आणि महिलांची माहिती उपलब्ध असेल. कोणतीही बेपत्ता व्यक्ती सापडल्यास किंवा तिची सुटका केल्यास, तिची तात्काळ आधार पडताळणी केली जावी किंवा नवीन आधार कार्ड तयार केले जावे, जेणेकरून बायोमेट्रिक आणि बोटांच्या ठशांद्वारे ओळख स्पष्ट होण्यास मदत होईल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news