ट्रम्प यांचे तुर्कीतून गुपचूप पलायन

वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याने आखातात युद्धाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर संकट घोंघावत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक धक्कादायक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. नाटो शिखर परिषदेसाठी तुर्कीयेला गेलेल्या ट्रम्प यांची इराणकडून हत्या होण्याचा धोका निर्माण झाला होता. परिस्थिती गंभीर झाल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी सिक्रेट मिशन राबवत डोनाल्ड ट्रम्प यांना तुर्कीयेतून अत्यंत गोपनीय पद्धतीने बाहेर काढण्यात आले होते. वॉशिंग्टन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प तुर्कीयेतून कसे बाहेर पडले याची सविस्तर माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तुर्कीयेला आले होते. गेल्या महिन्यात ८ जुलै रोजी नाटो शिखर परिषदेमध्ये सहभागी झाल्यानंतर ट्रम्प अंकारा विमानतळावरून एअर फोर्स वनमध्ये बसताना दिसले. कॅमे-यासमोर विमानात प्रवेश केल्यानंतर ट्रम्प यांना विमानातील कॅटरिंगच्या ट्रकमध्ये लपवून तिथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सी-३२ ई या छोट्या सैन्य विमानापर्यंत नेण्यात आले आणि तिथून त्यांना गुप्तपणे थेट ब्रिटनला पोहोचवण्यात आले. विशेष म्हणजे हे मिशन एवढ्या गुपचूप राबवण्यात आले की पत्रकार आणि अधिका-यांनाही याचा सुगावा लागला नाही.

ट्रम्प यांना कसे बाहेर काढले?
– ट्रम्प यांनी तुर्कीयेतील अंकारा येथील विमानतळावर पत्रकारांसमोर आणि कॅमे-यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रसिद्ध निळ्या-पांढ-या एयर फोर्स वन या मुख्य विमानात प्रवेश केला.
– विमानात चढल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांना गुपचूप विमानतळावरील कॅटरिंग ट्रकमध्ये बसवले. तिथून त्यांना सी-३२ई या अमेरिकन सैन्याच्या लहान विमानात हलवण्यात आले.
– एयर फोर्स वन विमानात उपस्थित असलेले पत्रकार आणि काही व्हाईट हाऊस कर्मचा-यांना ट्रम्प विमानातच आहेत असे वाटत होते.

– सुरक्षेचे कारण सांगून पत्रकारांना विमानाच्या खिडक्यांचे पडदे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या.
– सी-३२ ई या लहान विमानाने ट्रम्प यांना सुरक्षितपणे ब्रिटनच्या आरएएफ मिल्डेनहॉल या लष्करी तळावर पोहोचवले. त्याच्या अवघ्या काही मिनिटांनंतर एयर फोर्स वन विमानही तिथे उतरले.
– डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उधळला; इराणच्या अल-सादीला तुर्कीयेत बेड्या.

पत्रकारांच्या प्रश्नावर काय म्हणाले ट्रम्प?
ब्रिटनमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकारांनी विमानाच्या खिडक्यांचे पडदे बंद ठेवण्याबाबत विचारले असता ट्रम्प यांनी सूचक विधान केले. कदाचित आपण अत्यंत धोकादायक प्रवासात होतो. पण एक लक्षात ठेवा, जर मला काही झाले असते तर तुम्हीही माझ्यासोबतच गेला असता, बरोबर ना? असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला.

इराणने दिलेली धमकी
इराण आणि अमेरिकेमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. तुर्कीयेची सीमा इराणला लागून असल्याने सुरक्षेचा धोका अधिक वाढला होता. इराणमधील काही कट्टरपंथी लोकांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाचे शवपेटीतील चित्रे असलेले फलक लावून ‘खून का बदला खून से’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकन सैन्याला सिक्रेट मिशन राबवावे लागले. दरम्यान, याआधी २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन पाकिस्तानच्या दौ-यावर गेले असताना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनाही मुख्य विमानाऐवजी दुस-या अज्ञात विमानाने बाहेर नेण्यात आले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news