लातूर : प्रतिनिधी
संत गोरोबा सोसायटी, लातूर येथे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवमुद्रा गणेश मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते विविध पदाधिका-यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी बालाजी मोहन कांबळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी पवन सूर्यवंशी व विशाल जाधव, कोषाध्यक्षपदी संजय मस्के, तर सचिवपदी स्वप्नील कांबळे व रोहित सरवदे यांची निवड झाली. सहसचिवपदी अजय कांबळे आणि सहकोषाध्यक्षपदी विनोद क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून आधी कदम, रोहित कांबळे, रवी मस्के, आकाश पाटोळे व आनंद कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. मंडळाच्या सल्लागारपदी नगरसेवक विकास कांबळे, हरी पवार, देविदास गायकवाड, विश्वास दादा आंबेकर, विनायक कसबे, सतीश कांबळे, काशिनाथ वाघमारे, अजय आडगळे, संजय गव्हाणे, श्रावण मस्के, भगवान कांबळे, प्रकाश पाटोळे, लिमराज मगर, राजू गायकवाड, शंकर कांबळे, बळी गायकवाड, धना गायकवाड, मधुकर कांबळे, रमेश जोगदंड, गोविंद पुरी, राजू मस्के व रवी लोंढे यांची निवड करण्यात आली.















