पोलिस-विद्यार्थी संवादातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

रेणापूर : प्रतिनिधी
सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, महिला संरक्षणासंदर्भातील विविध कायदे, मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणा-या ११२ हेल्पलाईन क्रमांकाची माहिती विद्यार्थ्यांना देत सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन करून सजग नागरिक बनावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुधाकर देडे यांनी केले.
येथील शिवाजी महाविद्यालयात दि. ८ ऑगस्ट रोजी ‘पोलिस विद्यार्थी संवाद आणि मुलींचे आरोग्य व सुरक्षा’ या विषयावरील जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश यादव हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता देशमुख, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे, उपप्राचार्य दिपक रणदिवे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. संगीता देशमुख यांनी मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध बाबींवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सतीश यादव यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणा-या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून सुरक्षितता व आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.  प्रास्ताविक प्रा. सुवर्णा हालकुडे  यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा . सुप्रिया कांबळे  यांनी तर आभार प्रा. एम. बी. जाधव यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news