पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यासाठी आज प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या योजनेवर १७४ कोटी १९ लाख ३५ हजार ४२४ रुपये खर्च होणार आहेत. राज्यातील ४१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेतून नवीन दप्तर मिळणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा २०२०च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या सुमारे ४१ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांनी शाळेच्या सरकारकडे पाठवल होता. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १७४ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ज्या महानगर पालिकांकडून त्यांच्या स्वत:च्या निधीतून विद्यार्थ्यांना दप्तर किंवा त्यासाठीची रक्कम दिली जाते त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय योजनेतून वगळण्यात येणार आहे. सरकारकडून यापूर्वी मोफत पाठयपुस्तके, मध्यान्ह भोजन अशा योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये आता मोफत दप्तर योजनेची भर पडली आहे. ही योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या विद्यमान योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे. दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने त्याचा खर्च संबंधित निधीतून करण्यात येणार आहे.

दप्तरांचा दर्जा
या योजनेची अमलबजावणी आता दप्तरांचा दर्जा व विद्यार्थ्यांना दप्तरांचे वेळेवर होणारे वितरण यावर या योजनेची यश अवलंबून असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

ई निविदा प्रक्रयेव्दारे खरेदी
या दप्तरांच्या खरेदीसाठी ई निविदा प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रीयेत उद्योग विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरित निधीचा उपयोगिता प्रमाणपत्र सरकारला सादर करणे बंधनकारक केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
04:10:56
Video thumbnail
Latur|उजनी जि.प. शाळेत सीजीपीची एन्ट्री! अभिजीत दिपके यांनी घेतला थेट आढावा
04:54
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
00:00
Video thumbnail
Nanded|खरगे यांच्या सभेच्या मंचाचे गोमूत्राने शुद्धीकरण? नांदेडमध्ये मुंडन आंदोलन
00:35
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59

Latest news