नेपाळनंतर आता भारत हादरले

इंफाळ : नेपाळमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये नुकताच एक मोठा भूकंप झाला आहे. चीनच्या सिचुआन प्रांतात भूकंपाचे धक्के बसले. नेपाळला लागून असलेल्या चीनमध्ये शुक्रवारी हा भूकंप झाला. तिबेट आणि नेपाळमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. दरम्यान, भारतातील मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. चीनमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ होती, तर मणिपूरमध्ये ती ३.६ होती. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरनुसार, शुक्रवारी नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील लोंगचांग शहरात ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला. भोटेकोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नेपाळ आणि चीनमध्ये जमीन सतत हादरत आहे. यापूर्वी गुरुवारी रात्री नेपाळ आणि तिबेटमध्ये भूकंप झाला होता. सध्या तरी कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भारतातील मणिपूर राज्यातही भूकंप झाला आहे. मणिपूरमध्ये सकाळी १०:४९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.६ मोजली गेली. विविध प्रदेशांमध्ये भूकंपांच्या सततच्या घटनांमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे. यापूर्वी रात्री नेपाळ आणि तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के नोंदवले गेले. नेपाळमध्ये ३.२ तीव्रतेचा आणि तिबेटमध्ये ४.९ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. यानंतर, शुक्रवारी ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातही भूकंपाची नोंद झाली. हा भूकंप मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यात झाला. आज सकाळी आसाममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

चीनमधील हा भूकंपही महत्त्वाचा आहे, कारण नेपाळ आणि तिबेटमधील विध्वंसामागे भूकंप हे एक कारण मानले जात आहे. बुधवारी तिबेट आणि नेपाळमध्ये विनाशकारी पूर आला. सुरुवातीला, या पुराचे कारण भूकंप असल्याचा संशय होता. नंतर, उपग्रहाद्वारे आलेल्या फोटो आणि वैज्ञानिक विश्लेषणातून असे दिसून आले की, नेपाळ-तिबेट सीमेजवळील हिमनदी आणि पर्वतीय खडकाचा एक मोठा भाग कोसळल्यामुळे बर्फ, खडक आणि ढिगा-यांचा प्रचंड प्रवाह झाला होता. यामध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळमध्ये भूकंपाची मालिका सुरूच
नेपाळमध्ये अद्यापही संकटांची मालिका सुरुच आहे. तिबेटमध्ये बांध फुटल्याची माहिती असून त्यामुळे नेपाळला महापुराचा आणि त्यामुळे मोठ्या विनाशाचा धोका आहे. त्यातच शुक्रवारी रात्री उशरा चीनसोबत नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याने धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चीनमध्येही भूकंप
नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतात शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. लोंगचांग शहरात ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. नेपाळ आधीच पूर आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींशी झुंज देत आहे, ज्यामुळे संपूर्ण हिमालयीन प्रदेशात संभाव्य भूगर्भीय हालचालींमुळे चिंता वाढली आहे.

चीनमध्ये नुकसान नाही
लोंगचांग शहरात भूकंपानंतर कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्र लोंगचांग शहर असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, काल रात्री उशिरा नेपाळमध्ये भूकंप झाला होता. नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ३.२ तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद झाली, मात्र त्यामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, नेपाळमधील नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर या भागातील चिंता वाढली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नारळी पौर्णिमेला माहूर गडावर भाविकांची अलोट गर्दी; हजारो जण पायी दत्त शिखराकडे
00:39
Video thumbnail
Latur|बुलेटवर फटाका वाजवताय? सावधान! लातूर पोलिसांची थेट कारवाई
01:47
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून महामार्गावर हेल्मेट सक्ती;हेल्मेट नाही तर दंड
02:38
Video thumbnail
Nanded Murder|नांदेडमध्ये रक्तरंजित थरार! जुन्या वादातून तरुणाचा खंजरने खून
00:50
Video thumbnail
Latur|नांदगाव ग्रामसभेत मोठा गोंधळ! प्रश्नांवरून सत्ताधारी-विरोधक भिडले
07:02
Video thumbnail
PARBHANI|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
31:41
Video thumbnail
NANDED|एकमतच्या सन्मानाची... सन्मानार्थींच्या मनातील भावना
45:46
Video thumbnail
DHARASHIV|गौरवाच्या क्षणांची साक्ष... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
42:06
Video thumbnail
Solapur|एकमत वर्धापन गौरव २०२६... सन्मानार्थींच्या प्रतिक्रिया
28:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - परभणी
02:04:02
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - नांदेड
02:12:44
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत - धाराशिव
02:10:21
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत- सोलापूर
02:13:30
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52

Latest news