आता शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार

अंतरवाली : परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना फोन करत संताप व्यक्त केला आहे.

शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहात. तुम्ही मेळावा घेऊ नका नाही तर मी कार्यक्रमस्थळी येईल, मग एकनाथ शिंदेंना नांदेडला जाणं अवघड होईल, राज्य अस्थिर करू नका. बंडू जाधव यांनी शिरसाट यांचे ऐकूण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिरसाट यांचे ऐकूण मराठ्याच्या अंगावर येणार असतील तर संजय जाधव संपून जातील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

यावर बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, मनोज जरांगे यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे. आम्ही शेतकरी मेळाव्यासाठी गेली १५ दिवस तयारी केली आहे. आज मनोज जरांगे यांचा मला कॉल आला की कार्यक्रम रद्द करा मी त्यांना कार्यक्रम रद्द करायला लावू नका अशी विनंती केली. आता लोकं येऊन बसलेत आता तो कार्यक्रम रद्द करणे बरोबर नाही. तुमच्या आणि माझ्या भावना एकच आहेत पण कार्यक्रम रद्द होणार नाही. मनोज जरांगे यांनी आक्रमक होऊ नये. तुम्ही जे करत आहात तेच आम्ही करत आहोत. तुमच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करत आहोत. कार्यक्रम झाल्यावर तुम्ही आणि मी एकच आहोत.
मनोज जरांगे म्हणाले की, संजय जाधव यांचे अस्तित्व मराठा समाजाने उभे केले होते. संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंचे ऐकूण त्यांनी खूप मोठी चूक आहे. कार्यक्रम घेणे तुझे अस्तित्व नाही मराठा समाज सांभाळून ठेवणे तुमचे काम होते. आता तुमच्या राजकारणाला अवकाळा लागली. बंडू जाधव हा थर्ड क्लास माणूस निघाला. तुमच्याकडे ५०० गुंड असतील त्यावर राजकारण होत नसते, असे गुंड आम्ही रोज कोलतो.

शिंदेंचे आव्हान स्विकारले
तुमच्यामुळे आणि शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे अजून खोलवर गेले. एकनाथ शिंदेंनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले आहे त्यांना आता शिंदेंचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. येणा-या काळात बंडू जाधव यांना कळेल. आम्ही तिथे जाऊ नये म्हणून परभणीत मोठी ताकद लावली. मनोज जरांगे म्हणाले की, संजय जाधवांना वाटते की मी सत्ताधारी पक्षात गेलो आता काय होणार. शिरसाट यांनी जे प्रमाणपत्र रद्द केले ते पुन्हा मिळेपर्यंत आमचे शिंदे यांच्यासोबत चांगले संबंध होऊ शकत नाही. मराठ्यांच्या छाताडावर मेळावा घेत आहे. यांनी शेतक-यांना काय दिले आहे? आमची प्रमाणपत्र देईपर्यंत आमच्या मतदारसंघात कार्यक्रम घ्यायचा नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

..तर शिंदेंना माघारी जाणे अवघड होईल
मनोज जरांगे म्हणाले की, परभणीमधील शेतकरी मेळावा रद्द करा तिथे काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी आजपर्यंत कुठेही गेलो नाही पण जर कार्यक्रम होत असेल तर मी चाल करत तिथे येईल. तुम्हाला नेता महत्त्वाचा आहे की समाज महत्त्वाचा आहे. समाजासाठी तुम्ही कार्यक्रम रद्द करा. एकनाथ शिंदेंना सांगा समाजासाठी तुम्ही येऊ नये. चार प्रमाणपत्र जे रद्द करण्यात आले ते मिळेपर्यंत शिंदेंनी मतदारसंघात येऊ नये. मी जर तिथे आलो तर एकनाथ शिंदेंना माघारी जाणं अवघड होईल. तुमच्यामुळे राज्य अस्थिर होईल. मला तुमच्या मेळाव्याशी काही देणे घेणे नाही, पण समाजासाठी तुम्ही हा कार्यक्रम रद्द करा. तुम्हाला नेता महत्त्वाचा आहे की समाज? मी आजपर्यंत कुठेही गेलो नाही, पण कार्यक्रम झालाच तर मी स्वत: तिथे चाल करून येईन.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news