किल्लारी येथे निळकंठेश्वर यात्रेस उत्साहात प्रारंभ

किल्लारी : महेश उस्तुरे
यावर्षी निळकंठेश्वराची महापूजा करून यात्रा मूर्तीची स्थापना आमदार प्रवीण स्वामी व अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्याचा सत्कार देवस्थानच्या वतीने करण्यात आला. ही यात्रा दि २९ ऑगस्ट ते मंगळवार दि. ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत अकरा दिवस चालणार आहे. सकाळी ९ वाजता नवीन किल्लारी ‘ निळकंठेश्वर मंदीरापासून पालखी सोहळा सुरू होऊन ढोल ताशा, टाळ मृदंग,च्या आवजात सर्वांच्या हाती पताका घेऊन ॐ नम: शिवाय, हरहर महादेव, शिव शिव संब सदाशीव या मंत्रोच्चारात किल्लारी पाटी मार्गे जुने गाव निळकंठेश्वर मंदीरापासून तीन किलोमिटरवर आसलेल्या इश्वर दोह येथील शिवलींग पिंडीस भेट देऊन परत निळकंठेश्वर मंदीरात येऊन महापूजा भजन आरती करून आमदार प्रवीण स्वामी, अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते यात्रा मूर्ती स्थापन होऊन यात्रेस सुरुवात झाली. जवळपास दहा किलोमिटर पालखी सोहळा झाला. पालखी सोहळ्यात हजारोच्या संखेत भावीक पुरुष महिला सहभागी होते.

या निमित्ताने दररोजची महापूजा, आमदार प्रवीण स्वामी, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, श्रीशैल्य उटगे, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, आमदार बस्वराज पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, चरणसीग राजपूतअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई, डिवायएसपी कुमार चौधरी, श्रीशैल्य उटगे, तहसीलदार अडसूळ आप्पर तहसीलदार स्वामी, विविध विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालखी सोहळ्यासाठी व पालखीसोबत सपोनी महावीर जाधव यानी फौजफाटा घेऊन स्वता: बंदोबस्त करीत होते. पालखीसोबत पोलिस कर्मचारी पिएसआय गोपाळ शिंदे, एएसआय मरडे, ट्राफिक पोलीस दत्ता जाधव, कृष्णा गायकवाड रवि करके माळी, महिला पोलिस याना घेऊन चोख बेदोबस्त सोबत ठेवला होता.

दररोज प्रवचन, भजन, रोज रात्री नऊ ते बारापर्यंत नामवंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. आज दि. ३१ हभप जलाल महाराज नाशिक, दि १ सप्टेंबर रोजी ह भ प विलास महाराज, दि २ रोजी ह भ प माऊली महाराज फुलंब्री ,दि ३ ज्ञानेश्वर माऊली पठाडे, दि ४ ह भ प शिवलीलाताई पाटील, दि ५ रोजी निवृत्ती महाराज इंदुरीकर, दि ६ ह भ प प्रकाश महाराज साठे बीड, दि ७ रोजी रोहिणी परांजपे आळंदी यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दि ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते बारा हभप संभाजी झरे अनसरवाडा पांडुरंग गवळी मंगळवेढा, रघुनाथ बिराजदार घोटाळा, बळीराम बच्चे वलांडी यांचा जंगी भारुडांचा कार्यक्रम राहणार आहे. तसेच रक्तदान, मोफत स्त्री वंधत्व शिबीर डॉ. पोर्णीमा पाटील, नेत्रतपासणी शिबीर, शंकरसेठ हॉस्पीटल सोलापूर मोफत कॅन्सर शिबीर विवेकानंद हॉस्पीटल लातूर, मधुमेह बिपी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

किल्लारी पाटी ते निळकंठेश्वर मंदीर भाविकासाठी मोफत प्रवास सेवा सुर्यकांत बाळापुरे, बालाजी चव्हाण, जनार्दन डुमने व त्यांचे सहकारी मंडळ वहानाची सोय करीत आहेत. १० किलोमिटर पालकी सोहळ्यात जागो जागी भाविकानी पाणी, केळी, फराळचे साहित्य भावीकाना देण्याची सोय केली होती. जय महाकाल मित्र परीवारातर्फे खिचडी व पाणी वाटप करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|पिकं घटली अन् बाजार समिती ओस पडली! जळकोटमध्ये दुष्काळाचा दुहेरी फटका
01:47
Video thumbnail
Latur| सौ.आदितीताई देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना खास भेट; दोन शिलाई मशीन दिल्या!
04:04
Video thumbnail
Latur|गौरी-गणपतीच्या देखाव्यातून सरकारी शाळांचा आरसा; दिला शिक्षणाचा संदेश
02:49
Video thumbnail
Latur|एकमत परिवाराच्या बाप्पांची श्याम गोडभरले यांच्या हस्ते मनोभावे आरती!
01:50
Video thumbnail
Dattatreya Bharane|‘लवकरच शेतकऱ्यांना मदत करू’; दुष्काळी पाहणीत कृषिमंत्र्यांचं आश्वासन
02:21
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, तरी मांजरा नदीत पाण्याचा थेंब नाही!
04:35
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
10:17
Video thumbnail
Babasaheb Patil|लातूर जिल्हा बँक संचालक पदाबाबत RBI चा मोठा निर्णय;बाबासाहेब पाटील यांना केलं बडतर्फ
01:15
Video thumbnail
Sanjay Jadhav|‘दुष्काळ आहे तर मग कोणी खात नाही का?’ काजू-बदामावर जाधवांचा सवाल
03:16
Video thumbnail
Nanded Breaking|दुष्काळावर गंभीर चर्चा अन् टेबलवर काजू-बदाम; नांदेडमध्ये चर्चांना उधाण
00:39
Video thumbnail
Nanded Breaking|नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; गाडीसमोर काँग्रेसची घोषणाबाजी
01:22
Video thumbnail
Latur|पावसाळा संपत आला, पण तिरू नदीत पाण्याचा थेंबही नाही!
02:20
Video thumbnail
Latur|30 हजारांचा खर्च... अन् उभ्या टोमॅटो पिकावर रोटावेटर! शेतकऱ्याचा धक्कादायक निर्णय
02:01
Video thumbnail
Latur|औसेकरांच्या नळाला गढूळ पाणी; स्वच्छ पाण्याची नागरिकांची मागणी
01:05
Video thumbnail
Nanded|दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी कृषिमंत्री बांधावर; नांदेडपासून पाहणीला सुरुवात
06:56

Latest news