छत्रपती संभाजीनगरच्या एशियन रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग

छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ज्यानंतर एनआयसीयूमधील उपकरणांची तपासणी करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले.

परंतु, या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच आता छत्रपती संभाजीनगरच्या एशियन रुग्णालयातील एनआयसीयूला आग लागल्याची घटना शुक्रवारी (४ सप्टेंबर) घडली. आकाशवाणी चौकात असलेल्या एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे २.४५वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली. आग लागली त्यावेळी एनआयसीयू विभागात ९ लहान मुले उपचार घेत होती. परंतु, तत्काळ सर्व मुलांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात एसीच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. सुरुवातीला एनआयसीयूमध्ये असलेल्या एसीमधून धूर येत असल्याचे एनआयसीयूमध्ये असलेल्या रुग्णालय कर्मचा-यांच्या लक्षात आले. ज्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसनी मिळून एनआयसीयूतील ९ बालकांना बाहेर काढले. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल रात्रीचे बातमीपत्र 03.09.26
22:04
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल बातमीपत्र 03.09.26
28:03
Video thumbnail
BIG BREAKING | वसमतमध्ये २८८ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा; उपविभागीय कार्यालयासमोर अंत्यसंस्कार
01:02
Video thumbnail
BIG BREAKING | जांब बुद्रुकमध्ये कडकडीत बंद, नांदेड–बिदर महामार्गावर रास्ता रोको
00:54
Video thumbnail
BIG BREAKING | तुळजापूर–नळदुर्ग मार्ग रोखला; मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन
00:53
Video thumbnail
BREAKING | जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ लातूरमधील शाळा-महाविद्यालये बंद
02:46
Video thumbnail
BIG BREAKING | औशात मराठा बांधव आक्रमक; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
02:52
Video thumbnail
LIVE- एकमत डिजिटल दुपारचे बातमीपत्र 03.09.26
16:47
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; चार तालुके बंद, उद्या संपूर्ण जिल्हा बंद
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | मराठ्यांनी लातूरची मुख्य बाजारपेठ केली कडकडीत बंद; गंज गोलाईत शुकशुकाट
04:25

Latest news