पेपरफुटीवरून विद्यार्थी रस्त्यावर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या हजारो विद्यार्थ्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरत आक्रोश मोर्चा काढला होता.

एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील पेपरफुटी, सातत्याने होणारा नियोजनाचा अभाव आणि गट ‘ब’ परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी, अशा एकूण १२ प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. आयोगाच्या या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, या सर्व प्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून टढरउ चे अध्यक्ष आणि सचिव यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चेकरी करत आहेत.

वाहतुकीत मोठे बदल
मोर्चाची व्याप्ती पाहता शहर वाहतूक शाखेने सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या दृष्टिकोनातून वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. मोर्चाच्या मार्गावरील अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि उद्धवराव पाटील चौक हा मुख्य रस्ता आज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरात विद्यार्थ्यांचा तिस-यांदा एल्गार
छत्रपती संभाजीनगर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरून काढलेला हा सलग तिसरा मोठा मोर्चा आहे. यापूर्वी जुलै महिन्यात एमपीएससी गट ‘क’ परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. तर त्याआधी नोव्हेंबर महिन्यात वारंवार एकाच वेळी दोन परीक्षांच्या तारखा येत असल्याने नियोजनाच्या अभावावरून विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. आता पेपरफुटीसारख्या अत्यंत गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला असून सरकार आणि आयोगाचे डोळे उघडण्यासाठी ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news