शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात निवेदन देऊन परतत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता तहसील कार्यालयाजवळील आरी मोड-शिरूर अनंतपाळ रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात त्यांची जागीच प्राणज्योत मालवली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन देऊन विठ्ठलराव पाटील दुचाकीवरून परतत होते. याचदरम्यान तहसील कार्यालयाजवळील आरी मोड-शिरूर अनंतपाळ रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ित्यांच्या पार्थिवावर दि.१२ सप्टेबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता शेंद उत्तर या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा,मुलगी व भाऊ असा परिवार असून ते शरद पाटील यांचे ते मोठे बंधू होते.
















