मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतोय

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी रविवारी मध्य प्रदेश सरकारवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. त्यांनी स्वत:ला राज्याचे मुख्यमंत्री दर्शवणारे एक उपरोधात्मक राजीनामा पत्र सोशल मीडियावर शेअर केले. बालाघाट येथे संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झालेल्या आदिवासी मुलांच्या पालकांची भेट घेण्यासाठी गेले असताना दीपके यांना काही इन्फ्लुएन्सर्सकडून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेच्या दुस-याच दिवशी त्यांनी हे पत्र एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा तातडीने राजीनामा देत आहे. मध्य प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. या संधीचा सोनेरी वापर करण्यात आणि जनतेची सेवा करण्यात मी पूर्णपणे अपयशी ठरलो आहे, असे पत्र दीपके यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे. या उपरोधिक पत्रात दीपके यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या सहका-यांवर जोरदार टीका केली.

सागर जिल्ह्यातील बनावट दारूकांड आणि बालाघाटमधील मुलांचे मृत्यू यांसारख्या विविध मुद्यांवरून राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. यावर प्रतिक्रिया देताना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी मजेशीर टिप्पणी केली. दीपके हे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत, असा टोला त्यांनी हाणला. शनिवारी अभिजित दीपके यांनी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अदोरी, कोरका आणि बोंडारी या गावांना भेट दिली.

संसर्गजन्य आजारांमुळे प्राण गमावलेल्या आदिवासी मुलांच्या कुटुंबांचे सांत्वन करणे आणि स्थानिक आरोग्य सुविधांची माहिती घेणे हा या भेटीचा उद्देश होता. मात्र या दरम्यान इन्फ्लुएन्सरने त्यांना रोखले आणि तुम्ही इथे मृतदेहांचे राजकारण करायला आलात का? असा सवाल केला. विशेष म्हणजे याचा व्हीडीओ समोर आल्यानंतर एवढ्या दुर्गम भागात या दीपके यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर इन्फ्लुएन्सरला कुणी जाणीवपूर्वक पाठवले होते का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news