सरकार शेतक-यांच्या पाठीशी, सर्वच प्रकारची मदत करणार

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, ५ ऑक्टोबरनंतर पंचनाम्याची प्रक्रिया

मराठवाडा मुक्तिसंग्राम
दिनानिमित्त कार्यक्रम
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट सातत्याने घोंगावताना दिसत आहे. यंदाचे वर्षही दुष्काळाचे वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे, पिकांचे नुकसान झाले. कुठल्याही परिस्थितीत सरकार पूर्णपणे शेतक-यांच्या पाठीशी उभे राहील. पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर पूर्ण करून शेतक-यांना मदत करू. पिण्याचे पाणी, चारा याचे नियोजन केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ््यास उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, मानवंदना, शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित सोहळ््यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे, आ. सुहास शिरसाट, विधानसभा सदस्य आ. रमेश बोरनारे, आ. प्रदीप जयस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. विलास भुमरे, आ. अनुराधा चव्हाण, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.

मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला. पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही. हा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी कृष्णा खो-यातील पाणी भीमा खो-यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणायचे काम सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल. तसेच गोदावरी खोरे, उल्हास खो-यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जवळपास ७० टीएमसी पाणी उल्हास खो-यातून गोदावरीच्या खो-यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. टप्प्याटप्प्याने ७ वर्षात हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतक-यांना दिला. आतापर्यंत १५ लाखांच्या वर शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. शेतक-यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय आता जवळपास ४८ हजार कोटी रुपयांची, जुनी वीज बिल रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असेही त्यांनी सांगितले.

कृष्णा खोरे, कोकणचे पाणी
मराठवाड्यात आणणार
मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला. आता दुष्काळाशी संघर्ष सुरू आहे. आताही पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे. या परिस्थितीत शासन शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णा खो-यातील वाहून जाणारे पाणी आपण मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सक्षम, जलद दळणवळण
जालना ड्रायपोर्टचं काम आता सुरू झाले आहे. आपल्याकडे तयार होणा-या इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या आवश्यक आयात-निर्यातीची सुविधा या ड्रायपोर्टवरून करण्यात आली आहे. तसेच संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातही आपल्याला चांगला वाव आहे. त्यासाठी आपण शेंद्रा-बिडकीन आणि बिडकीन-ढोरेगाव हे दोन रस्ते सहा पदरी करीत आहोत.

 

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news