23 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयमाता सीतेकरिता मुस्लिम कारागीरांकडून खास पैंजण

माता सीतेकरिता मुस्लिम कारागीरांकडून खास पैंजण

५५१ ग्रॅम चांदीचे वजन

आग्रा : येत्या १७ जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच २२ जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यााकरिता मुस्लिम कारागीर माता सीतेसाठी खास पैंजण तयार करत आहेत.

दरम्यान, सध्या सर्वांनाच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा लागलीय. १७ जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. २२ जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. तसंच श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत. यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणाहून शाळीग्राम निवडण्यात आले आहेत.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी वाराणसीच्या काशीपूर भागात पूजेची भांडी तयार केली जात आहेत. तसंच आशियातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात माता सीतेसाठी चांदीच्या मोराच्या आकारांप्रमाणं नक्षीकाम असलेलं पैंजण तयार केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे मुस्लिम कारागीर अनेक वैशिष्ट्यांसह ही पैंजण तयार करताय. तसंच ही पैंजण घेऊन सराफा व्यापारी प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्येला जाणार आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती देत आग्रा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष नितेश अग्रवाल म्हणाले की, ५०० वर्षांनंतर आमचे लाडके रामलल्ला त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आग्रा येथील मुस्लिम कारागीर माता सीतेसाठी चांदीचे पैंजण तयार करत आहेत. या पैंजणाचे वजन ५५१ ग्रॅम आहे. त्यात माता सीतेची आवडती मोराची आकृती असेल. मुस्लिम कारागिरांनी ६ इंच चांदीच्या पायथ्यावरील झालरांमध्ये मोराची मोठी आकृती कोरली आहे. तसंच मोराच्या पिसात चक्र बनवण्यात आलीय. त्यात मोटर आहे. त्या मोटरने दोन्ही चाके फिरतील. यामुळे पैंजणाचे सौंदर्य आणखी वाढेल. तसंच या पैंजणाची किंमत ४० हजार रुपये इतकी आहे. आग्रा सराफा असोसिएशन हे पैंजण प्रभु श्रीराम आणि माता सीता यांना भेट म्हणून सुपूर्द करेल.

ही पैंजण तयार करणारे कारागीर फाजील अली यांनी पैंजणावरील मोराची आकृती कोरली आहे. ते म्हणाले की, आग्रा हे गंगा-जमुना संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. हीच बाब लक्षात घेऊन माता सीतेसाठी चांदीचे पैंजण बनवण्यात आले. यानंतर प्रभू श्रीरामांसाठीही पैंजण बनवण्यात येईल. आर्ग्याचे उत्कृष्ट पैंजण रामलल्ला आणि माता सीता यांच्या पायाचे सौंदर्य वाढवतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR