तुमचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे का? पाहा ३५८ पैकी दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांची संपूर्ण यादी

दीर्घ काळापासून दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. ‘ट्रिगर-१’ चे निकष पूर्ण झालेल्या तालुक्यांमध्ये हा दुष्काळ लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतातील पिकांचे पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता सरकारने थेट ही घोषणा केली आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळ घोषित झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत आणि इतर शासकीय सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महसुली विभाग आणि जिल्ह्यानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी
अ. कोकण विभाग (ठाणे महसुली विभाग)
रायगड: श्रीवर्धन
रत्नागिरी: रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग: सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला

ब. उत्तर महाराष्ट्र (नाशिक महसुली विभाग)
नाशिक: मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे: धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर
जळगाव: एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदूरबार: अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर: नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता

क. पश्चिम महाराष्ट्र (पुणे महसुली विभाग)
पुणे: भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ
सातारा: सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर: पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड

ड. मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग)
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना: बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड: बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट
धाराशिव: धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
नांदेड: नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
परभणी: पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली: हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

इ. विदर्भ (अमरावती आणि नागपूर महसुली विभाग)
बुलढाणा: जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती: अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर
अकोला: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
वाशीम: वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ: यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
वर्धा: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
नागपूर: नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा: भंडारा, पवनी, लाखांदूर
गोंदिया: तिरोडा
चंद्रपूर: चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा
गडचिरोली: गडचिरोली, मोर्शी

दुष्काळ घोषित झाल्यानंतर मिळणाऱ्या शासकीय सवलती
दुष्काळ जाहीर झाल्यामुळे बाधित भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि सोयी-सुविधा मिळण्याचा मार्ग सुकर होतो. यामध्ये प्रामुख्याने शेतकाऱ्यांचा जमीन महसूल माफ करणे, शेती कर्जाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देणे आणि कर्जाचे पुनर्गठन करणे या उपाययोजनांचा समावेश असतो.

याशिवाय दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात सवलत किंवा माफी दिली जाते. तसेच पिण्याच्या पा टंचाई असलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करणे आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या उभारण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जाते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:28
Video thumbnail
🔴 LIVE -विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे दाखल
07:45
Video thumbnail
🔴 LIVE -लातूरमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा; नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
28:39
Video thumbnail
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! 355 तालुक्यापैकी 265 तालुक्यात ट्रिगर 1 लागू
06:30
Video thumbnail
Sunetra Pawar|शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – सुनेत्रा पवार
02:42
Video thumbnail
Latur|गुरुराज माऊलीच्या जयघोषात जळकोटमध्ये गणरायांना उत्साहात निरोप
00:48
Video thumbnail
Sunetra Pawar|दुष्काळाने शेतकरी हतबल; उपमुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
01:16
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
14:27
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
07:40
Video thumbnail
🔴 LIVE - ढोल-ताशांचा गजर, अन् बाप्पाचा जयघोष; लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
09:45
Video thumbnail
Nanded|मीनल पाटील आणि पती गजानन पाटील यांना नोटीस
01:16
Video thumbnail
Latur|शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश विसर्जनाचा जल्लोष
01:49
Video thumbnail
Latur कुंडलीतील दोष दूर करण्याच्या नावाखाली अत्याचार;लातूरमध्ये धक्कादायक प्रकरण
07:21
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी मनपा सज्ज; १६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
03:54
Video thumbnail
Latur|गणेश विसर्जनासाठी मनपाची तयारी; झोन ‘ड’ मध्ये मूर्ती संकलन केंद्र
01:21

Latest news