पुस्तकी ज्ञानासोबत ओजीटी उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणार

लातूर : प्रतिनिधी
आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व तत्सम शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसाय किंवा नोकरी मिळविण्याआधी त्यांना त्या विषयाचे सखोल शास्त्रीय ज्ञान आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवा या दृष्टिकोनातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा ऑन जॉब ट्रेनिंगची संकल्पना अभ्यासक्रमामध्ये मांडण्यात आली आहे. यामुळे पुस्तकी ज्ञानासोबत ओजीटी उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणार असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रशिक्षण व इंटर्नशिप विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणा-या नऊ महाविद्यालयातील ओजीटी समन्वयक, सह-समन्वय आणि प्राध्यापकांसाठी महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. सभागृहामध्ये आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी विचारमंचावर महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक राजेश्वर पाटील, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ.सुजाता चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.एम.प्रयास, प्राचार्य डॉ.पी.बी.गोर, नोडल अधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे आणि सहाय्यक समन्वयक प्रा.रामेश्वर देव्हडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणासोबत दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आसल्याचे सांगून सांगवे म्हणाले की, जपानमध्ये आठव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान दिले जाते, त्याच दृष्टिकोनातून आपणही आपल्या देशामध्ये पुस्तके ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान जागृत होऊन आपले राष्ट्र विकसित होईल असेही ते म्हणाले. यावेळी रेवडकर म्हणाले की, लातूर शहर हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे बाजारपेठेचे ठिकाण आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे.
यावेळी पाटील टाकळीकर म्हणाले की, बाराव्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी पन्नास विविध प्रकारच्या उद्योगाची माहिती सर्वसामान्य लोकांना दिली होती. आजही बसवकल्याण येथे उद्योग विश्व केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने उद्योग विश्व निर्माण केले जात आहे. आज विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि कौशल्यपूर्ण दृष्टिकोनातून व्यवसायभिमुख शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाभिमुख शिक्षणाची सुविधा प्राचीन काळामध्ये उपलब्ध असल्याची माहिती आपल्याला आहे. दुस-या सत्रामध्ये प्रा.रामेश्वर देव्हडे यांनी विद्यापीठाने दिलेले विविध प्रपत्र यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी केले तर आभार डॉ.डी.आर.भुरे यांनी  मानले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Traffic Police|आईच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेचे सुरक्षा कवच!
02:17
Video thumbnail
५ हजार मदत म्हणजे क्रूर थट्टा; दुष्काळग्रस्तांना १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनांची मागणी.
10:59
Video thumbnail
Parbhani|परभणीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन!
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ५५ वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा; २४ तासांत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
02:49
Video thumbnail
DCC BANK ELECTION|पक्षीय राजकारण बाजूला! सहकारमंत्री बाबासाहेब पाटील धिरज देशमुखांसोबत
04:38
Video thumbnail
Maharashtra Drought|५ हजारांत दुष्काळ मिटणार? शेतकऱ्यांची बोळवण? | मुद्दा महाराष्ट्राचा
48:16
Video thumbnail
Nanded|कंधारमध्ये मध्यरात्री कार मन्याड नदीत कोसळली; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
01:37
Video thumbnail
Nanded|माहूरच्या केरोळी घाटात भीषण अपघात! टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर
01:10
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा होणार; विविध कार्यक्रमांचे आयोजन
02:29
Video thumbnail
Latur Drought|पाच हजारांची मदत देऊन फडणवीस सरकारने केली शेतकऱ्यांची थट्टा?
09:48
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|जिल्हा बँकेच्या कामांच्या विश्वासावर निवडणूक लढवतोय! धिरज देशमुखांचा दावा
05:15
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47

Latest news