सरकारकडून शेतक-यांची फसवणूक; सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी होरपळत असताना सरकारकडून केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. ही मदतही अद्याप शेतक-यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यासह नमो कृषी योजनेचे थकीत हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी सोमवारी (दि. १९) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या शहरात आल्या असता सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून, अशा वेळी निवडणुकांपेक्षा जनतेला मदत देण्याला प्राधान्य द्यायला हवे होते. निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंर्त्यांकडे केली होती.

मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच शेतक-यांना कर्ज मंजूर होऊनही त्याचे वितरण रोखले जात असल्याचा आरोप करत सुळे यांनी चारा छावण्या सुरू करण्याबाबत, कर्जमाफी आणि कर्जवसुली थांबविण्याबाबत सरकारला जाब विचारला. नमो कृषी योजनेचे दोन हप्ते अनेक शेतक-यांना मिळालेले नाहीत. शेतक-यांचे पैसे कुठे गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे लिहून शेतक-यांना मदत करण्याची भूमिका मांडली आहे. मात्र, सरकारकडून निराशाजनक प्रतिसाद मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत समन्वय असून, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. ठाकरे गटाकडून पाठिंब्याची सकारात्मक बातमी लवकरच येईल, अशी अपेक्षाही खा. सुळे यांनी व्यक्त केली.

दरम्यान राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारला लक्ष्य करताना सुळे यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ला आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चौकशी तातडीने करून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी आमदाराच्या कुटुंबालाच सुरक्षितता मिळत नसेल, तर सामान्य माणसाने सुरक्षित कसे जगायचे, असा सवाल त्यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात | संजय बनसोडे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण
02:22
Video thumbnail
Nanded|माहूरगडावर व्हीआयपी दर्शनामुळे वाहतूक कोंडी? संतप्त भाविकाने आमदाराच्या गाडीची काच फोडली
01:39
Video thumbnail
Latur|जळकोट पोस्ट ऑफिसमध्ये दिव्यांगांची हेळसांड; प्रशस्त जागेत स्थलांतर करण्याची मागणी
01:29
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये जुने शेतकरी भवन जमीनदोस्त | दीड कोटींच्या नवीन भवनाचे काम सुरू होणार
02:04
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57
Video thumbnail
CRPF Jawans Dandiya Celebration | सीआरपीएफ जवानांचा दांडिया | Navratri Special | Ekmat Digital
01:35

Latest news