अहमदपूर: रविकांत क्षेत्रपाळे
राज्य सरकारने मन आभाळाएवढे मोठे करून,उदार होऊन खसखसीच्या दाण्याऐवढी लहान ५ हजार रुपयांची तुटपुंजी अग्रीम मदत जाहीर केली असून यासाठी या तालुक्यातील ६६ हजार ५५ शेतक-यांना दिवाळी पूर्वी मिळणारी रक्कम सरकारने अनेक निकष लावल्यामुळे ही मदत दिवाळी पूर्वी अजिबात मिळू शकणार नाही. सरकारकडे सर्व शेतक-यांच्या याद्या आणि बँकेचे खाते नंबर आहेत. ही मदत शेतक-यांना एकाच वेळी मिळणे आवश्यक आहे. परंतु, तसे होत नसल्याने शेतकरी सरकारच्या नावाने काळी दिवाळी साजरी करीत आहेत.
‘फार्मर आयडी’ काढलेले शेतकरी हे ६०९८८ इतके आहेत.जवळपास या तालुक्यातील ५०६७ शेतक-यांनी फार्मर आयडी काढलेले नाहीत.ईकेवायसी केलेले शेतकरी, आयकर भरणारे शेतकरी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी या बळीराजाला सरकार अग्रीम मदत देणार की नाही हे मात्र अजूनही अजिबात समजू शकले नाही. यामुळे या तालुक्यातील हजारो शेतकरी तुटपुंज्या अग्रिम मदतीतून वगळले जाणार आहे.
















