35.2 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeलातूरबाभळगावात वेळाअमावस्या उत्साहात

बाभळगावात वेळाअमावस्या उत्साहात

लातूर : प्रतिनिधी
कृषी संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळख असलेल्या दर्शवेळा अमावस्याच्या निमित्ताने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी वेळाअमावस्येनिमित्त बाभळगाव येथील शेतात जाऊन काळ्या आईचे पूजन व पांडव पूजन करून सर्वांना वेळाअमावस्येच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांसोबत वनभोजनाचा आस्वादही घेतला.
बाभळगाव येथे कृषी संस्कृतीशी निगडित सर्वच सण, उत्सव  मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. ही एक आगळी-वेगळी परंपरा विकासरत्न विलासराव देशमुख यांच्यापासून नेहमीच पाळली गेली आहे. दि. ११ जानेवारी रोजी दुपारी  दर्शवेळा अमावस्या साजरी करण्यात आली. या वेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,  लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, विलास  सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी  शेताची, देवी-देवतांची मनोभावे पूजा केली. सर्वांचे पालनपोषण करणा-या  निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या नंतर स्नेही, मित्रपरिवार, सहकारी यांच्यासह निसर्गाच्या सानिध्यात स्नेह भोजनाचा आनंद घेतला.
या वेळी  अभिजित देशमुख, डॉ. सौ. सारिकाताई देशमुख,  सत्यजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, मारूती महाराज  सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, लातूर कृषी  उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, दिलीप माने, पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, प्रा. प्रवीण कांबळे, मनोज पाटील, राजकुमार पाटील, श्याम देशमुख, गोविंद देशमुख, बादल शेख, राजेसाहेब सवई, बालाजी वाघमारे, दगडूसाहेब पडिले, शेषराव हाके पाटील, सचिन मस्के,  विश्वनाथ कागले, प्रवीण माने, शिवाजी देशमुख, बळवंतराव पाटील, आनंद वैरागे, इसरार पठाण, एम. पी. देशमुख, अब्दुल्ला शेख, करीम तांबोळी, पिराजी साठे,  संदीप सूर्यवंशी, बालाजी कदम आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR