नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याची माहिती समोर आली. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल अशी होती. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक धावत पळत घराबाहेर पडले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याची माहिती देण्यात आली.
शुक्रवारी रात्री ११.३२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. त्यामुळे लोक भयभित होऊन घराबाहेर पडले. लोक जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना हे धक्के बसले. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. लोक सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यामध्ये पंखे, झुंबर आणि दिवे हलताना स्पष्ट दिसत आहे. यावरून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येतो.