अकोला : अकोला पश्चिमचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी गोवर्धन शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. पण उपचारादम्यान शुक्रवारी रात्री ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करत गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.