मुंबई : दिवाळीची तयारी सर्वत्र सुरू असताना ही दिवाळी महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे. ऐन दिवाळीत मैदा, खोबरं, बेसन, डाळीपासून सर्व प्रकारची कडधान्यं महागल्याची एक बातमी राष्ट्रवादी काँग्रेसने समाजमाध्यमावर ट्वीट केले आहे. किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गूळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींचे दर किरकोळ बाजारात ३५ ते ४० टक्के वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात तूरडाळ १३०रुपये किलो होती, तिचा दर १९० रुपये किलो झाला आहे
ऐन सणासुदीच्या तोंडावर दिवाळीचा फराळ कडू कडणारी बातमी आली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य गृहिणीचे किचनचे बजेट कोलमडले आहे. दिवाळीसाठी लागणा-या सर्व अन्नपदार्थांचे भाव ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. फराळाच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड महागले आहेत. गेल्या दोन महिन्यांनी तूरडाळ आणि इतर डाळींचे भाव प्रचंड वाढले आहेत. फराळासाठी लागणारे साहित्य महागल्याने लोक रेडिमेड फराळाकडे ग्राहक वळत असतात. रेडिमेड फराळाचे दर गेल्या वर्षांच्या तुलनेत किलोमागे १०० ते १२० रुपयांनी महागले आहेत.
सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या
गेल्या दोन महिन्यांत डाळी आणि कडधान्याचे दर वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ किरकोळ बाजारात १३० रुपये किलो होती. आज ती १९० रुपये किलो आहे. चणाडाळ दोन महिन्यांपूर्वी ७० रुपये किलो होती, आज ती १०० रुपये किलो आहे. मूगडाळ दोन महिन्यांपूर्वी ९० रुपये होती आज ती १३० रुपये किलो होती. बेसन दोन महिन्यांपूर्वी ८० रुपये किलो होते, आता बेसनचा दर १२० रुपये किलो आहे. मैदा पूर्वी ४० रुपये किलो होता आज ६० रुपये किलो झाला आहे.