नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील वर्षीच्या तुलनेत सूर्यफूल पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे. त्याचप्रमाणे खाद्यतेलाची आयातदेखील वाढलेली आहे. इस्राईलमधील युद्धजन्य स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे यंदाची सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे.
महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच चाट बसत असल्याचे चित्र आहे. त्यातच खाद्यतेलांचे दर कमी झाल्याने सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना देखील काहीसा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे गृहिणींचे बजेट पुन्हा एकदा कोलमोडले होते. पण आता खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याने गृहिणींना काहींसा दिलासा मिळाला. मागील वर्षी खाद्यतेलांचे दर हे अधिक होते. पण यंदा हे दर ३० ते ३५ टक्क्यांना कमी झाले आहेत. परंतु शेंगदाणा तेलाचे दर जैस थे राहिले.