34 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeसोलापूरसुपेकर यांना उर्दू मित्र तर डॉ .पटेल, कवी सातखेड यांना जीवन गौरव

सुपेकर यांना उर्दू मित्र तर डॉ .पटेल, कवी सातखेड यांना जीवन गौरव

सोलापूर : अ.भा.उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने दरवर्षी उर्दू दिनानिमित्त मराठी भाषिकातून उर्दू भाषा अवगत असणाऱ्या व उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या एका मान्यवरांचा ‘उर्दू मित्र’ म्हणून, तर उर्दू साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या योगदानासाठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

यावर्षी सौ.काजोल राजेंद्र सुपेकर यांचा ‘उर्दू मित्र’ म्हणून तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व कवी अशफाक सातखेड यांना तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे उर्दूचे ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार डॉ .जी.एम. पटेल यांना गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक१४फेब्रुवारी रोजी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु .डॉ. प्रकाश महानवर, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त .मच्छिंद्र घोपल, महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनअधिकारी .संजय जावीर व प्रा.इ.जा. तांबोळी प्राचार्य सोशल कॉलेज यांचे उपस्थितीत सांयकाळी 6.30 वाजता कॉ.एन.आर.बेरिया शैक्षणिक संकुल, लष्कर येथे आयोजित करण्यात आले आहे.

उर्दू व मराठी भाषिकात संबंध दृढ होऊन त्यांच्यात प्रेम व स्नेहभाव निर्माण व्हावा या हेतूने ‘उर्दू मित्र’ म्हणून गौरव करण्याचा निर्णय अकरा वर्षापूर्वी संस्थेतर्फे घेण्यात आला. यापूर्वी डॉ.सतीश वळसंगकर, अ‍ॅड. ए. जी. कुलकर्णी, . मयुर इंडी, प्रा. मनोहर जोशी,. गिरीश रामचंद्र चौधरी, .मुकुंद भडंगे, शैलेंद्र विश्वासराव पाटिल, स्मिता अनंत देशपांडे, वैशाली किरानंद बोने व हेमंत नारायण कुलकर्णी यांना उर्दू मित्र म्हणून सन्मानित करणेत आलेले आहे. यावर्षी हि संस्थेच्या वतीने उर्दू मित्र व शैक्षणिक व साहित्यीक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शॉल व श्रीफळ तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस विकारअहमद शेख, अय्यूब नल्लामंदू , रफिक खान, नासर आळंदकर, व हारुन बंदुकवाला आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR