22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यपुण्याच्या खराडी, केशवनगरमध्ये करोडोंच्या संख्येने डासांची वावटळ

पुण्याच्या खराडी, केशवनगरमध्ये करोडोंच्या संख्येने डासांची वावटळ

पुणे : पुण्याच्या खराडी आणि केशवनगर भागात करोडोंच्या संख्येने डासांची वावटळ उठली. याचे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात वावटळ उठूनही महापालिका पातळीवर औषध फवारणी आणि जलपर्णी काढण्याचे उपाय केले जात आहेत. जलपर्णी काढण्यासाठी बायो एन्झायमिंग वापरण्याचे प्रयोग केले जात आहेत.

मात्र जलपर्णी का वाढते आहे यावर उपाय काय आहेत, या विषयी तज्ञ म्हणतात जलपर्णी काढून टाकणे हा तात्पुरता उपाय आहे.

ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, औषध फवारणी आणि जलपर्णी काढण्याचे उपाय दीर्घकालीन नाहीत. औषध फवारणे म्हणजे दुसरे प्रदूषण वाढणार; फुफ्फुसाचे आजार वाढण्याची शक्यता अधिक आहे.

ज्या पाण्यात नायट्रेट फॉस्फेट हे द्रव्य असते अशा पाण्यात जलपर्णी वाढते. ज्या पाण्यात मलमूत्र किंवा सांडपाणी मिसळले जाते तिथे असे प्रकार होतात.

त्यामुळे जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय आहे. जोपर्यंत नदीतील पाणी प्रदूषित राहील तोपर्यंत जलपर्णी उगवणे थांबविता येणे शक्य नाही. या विषयावर सखोल अभ्यास करणा-या काही संस्था आहेत त्यांची मदत घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे.

याबाबत पर्यावरण विषयाचे अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, या सगळ्याच्या मागे नदीची प्रदूषणाची पातळी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. यामध्ये मलमूत्राची पातळी म्हणजेच सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जलपर्णी वाढली आहे.

या जलपर्णीवर डासांना अंडी घालण्यासाठी आदर्शवत अधिवास तयार होतो. जलपर्णीमुळे सुपोषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नदीमधील जलचर आणि स्थानिक वनस्पती या पूर्णपणे हद्दपार झाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR