27.5 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeलातूररंगबेरंगी आकाशकंदीलाने बाजारपेठ फुलली

रंगबेरंगी आकाशकंदीलाने बाजारपेठ फुलली

लातूर : प्रतिनिधी
प्रकाशाचा उत्सव असलेला दीपावली आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. रोषणाईचे अतूट असे नाते असलेल्या हा सण प्रकाशाने उजळून काढण्यासाठी पारंपरिक आणि काही नवीन प्रकारातील आकर्षक आकाशकंदिलांनी शहरातील मुख्य बाजारपेठ सजली आहे. चांदणी, रॉटल करंजी, पेशवाई, भवरा, अनारवाले,वेलवॉट, यासह इकोफ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील यंदा बाजारात उपलब्ध असून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे होलसेल व्यापारी इरफान बाबा यांनी सांगितले आहे.

दिवाळीच्या तयारासाठी सा-यांची लगबग सुरु झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. दिवाळीचा प्रकाशोत्सव सजविण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे आकर्षक असे आकाशकंदील दाखल झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईसह छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रोड, अंबाजोगाई रोड, बार्शी रोडवरील बाजारपेठांमध्ये विविध आकाराचे आकर्षक आकाशकंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत. या वर्षी आकाश कंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकारही बाजारात दाखल झाले असल्याचे किरकोळ व्यापारी गोल्डे यांनी एकमतशी बोलताना सागीतली.

आकार आणि प्रकारांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन आकाशकंदीलचे प्रकार बाजारात दाखल होतात. या वर्षी ग्राहकांनी चायनामेड वस्तूंकडे पाठ फिरवत आपला मोर्चा पारंपरिक आकाशकंदीलकडे वळवला असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. कंरजी कंदील, अनारवाले अ‍ॅटम, वेलवॉट, खणाचे कंदील यांच्याप्रमाणेच छोटया आकाराच्या कंदीलांनाही ग्राहकांची मोठी मागणी आहे. मात्र महागाईचे सावट दीपावलीच्या सजावटी वस्तूंवरही दिसून येत आहे. आकाशकंदीलचे दरातही १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शहरातील बाजारपेठेत आकाशकंदिलचा विक्रीसाठी येनारा सर्वत्र माल हा मुंबई व भिवंडी येथून दाखल झाला आहे. तर उरउरीत माल हा लोकल येथूनही बाजारात आला असल्याचे किरकोळ व्यापारी यांनी सागितले.

आकाशकंदीलांनी बाजारपेठेत रौनख आल्याचे दिसत आहे. सायंकाळच्यावेळी बाजारपेठेत आकाशकंदीलांचा लखलखाट पाहायला मिळत आहे. आकाशकंदील विक्रीचे शहरात विविध ठिकानी असंख्य स्टॉलस लागले आहेत. प्रत्येक स्टॉलवर आकाशकंदलांचे दरही वेगवेगळा सोरूपात आहेत. सर्वात लहान आकाशकंदील ६० रुपये तर सर्वात मोठे १५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. काही ठिकाणी आकाशकंदील १५० रुपये ते १००० रुपये तर काही ठिकाणी २०० रुपये ते १४०० रुपयांपर्यंत आकाशकंदीलांच्या किंमती असून बाजारात त्यांची विक्रि केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR