29.7 C
Latur
Monday, April 21, 2025
Homeलातूरइमारत बांधकाम कामगारांसाठी नोंदणी अभियान

इमारत बांधकाम कामगारांसाठी नोंदणी अभियान

किनगाव : प्रतिनिधी 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कामगार लाभार्थ्यांना गृह उपयोगी वस्तू संच मिळावा यासाठी माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या पाठपुराव्याने सताळा येथे नोंदणी अभियान राबविण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना अनेक लाभ मंडळाकडून दिले जातात त्याचाच भाग म्हणजे सक्रिय नोंदणी असलेल्या कामगारांना गृह उपयोगी लागणारे भांडे ( साहित्य ) देण्यात येते. या गृह उपयोगी साहित्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून या कामगारांची नोंदणी सताळा येथे करण्यात आली. या मिळणा-या साहित्यात ताट ४, वाट्या ८,पाण्याचे ग्लास ४, पातेले झाकणासह ३, मोठा चमचा २, पाण्याचा जग १,मसाला डब्बा १,डब्बा झाकणासह ३,परात १,प्रेशर कुकर १, कढई  स्टील १,स्टिलची टाकी झाकणासह असे एकूण ३० नग साहित्य देण्यात येते. हे साहित्य मिळावे यासाठी नोंदणी कृत कामगारांची नोंदनी करण्यात आली.
या अभियानाचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच लक्ष्मण खंदाडे, चेरमन रामराव शिंदे, नागनाथ खंदाडे, माजी सरपंच दामोदर कांबळे, राजाभाऊ खंदाडे, कोंडीराम गायकवाड, बाबुराव बेंद्रे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरख भुसाळे आणि ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. नोंदणीकृत कामगारांची गृहउपयोगी साहित्यासाठी नोंदणी करण्यासाठी डि.एन.अडसुळे, प्रशांत चामे,कल्पेश सरवदे,नागनाथ केंद्रे आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR