30.4 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeपरभणीएरंडेश्वर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा विस्कळीत

एरंडेश्वर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा विस्कळीत

पूर्णा : तालुक्यातील एरंडेश्वर येथील आरोग्य केंद्रात पुरेशे मनुष्यबळ नसल्याने याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने रिक्त पदाची भरावीत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

एरंडेश्वर परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून नागरिकांना सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी अधिका-यांसाठी निवासस्थाने उभारली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असून या केंद्रांअतर्गत पिंपळगाव, बाळापुर, कोडगाव, लक्ष्मीनगर, सुरवाडी, आडगाव, नावकी, भीम नगर, वडगाव आदी गावे येतात. सध्या वातावरण बदलामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आजार सतावत आहेत.

आरोग्य केंद्रातील रिक्त पदामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक, मलेरिया १ कनिष्ठ सहाय्यक, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ औषध निर्माता, १ सफाई कामगार, १ शिपाई असे पदे रिक्त आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR