34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरशालेय पोषण आहाराची काळ्या बाजारात विक्री

शालेय पोषण आहाराची काळ्या बाजारात विक्री

सोलापूर : सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खळबळजनक गुन्हा दाखल झाला आहे. शालेय पोषण आहार काळ्या बाजारात विक्री केल्या बाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. शालेय पोषण आहार असो किंवा रेशनचा शासकीय माल असो याचा काळा बाजार सोलापूर शहरात होत असल्याचा पुरावासमोर आला आहे. माजी महापौर मनोहर सपाटे, शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा सोलापूरे आणि तांदळाच्या काळ्या बाजारातील मुख्य सूत्रधार सोहेल कलबुर्गी यांवर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे एपीआय नंदकुमार सोळंकी यांनी फिर्याद दिली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हा दाखल झाला .

सोहेल कलबुर्गी हा तांदळाच्या काळ्या बाजारातील मुख्य संशयीत इसम आहे. कर्नाटक सह महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यात यावर गुन्हे दाखल आहेत. सोलापूर शहरातील मार्केट यार्डात कलबुर्गी नावाचे मोठे तांदळाचे दुकान देखील आहे. शालेय पोषण आहाराचा या प्रकारे दुरुपयोग होत असल्याचा उदाहरण प्रत्यक्षरित्या समोर आले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.२ मार्च २०२४ रोजी दुपारी 112 चा कॉल आला होता, राजर्षी शाहू प्राथमीक विद्यालय ( जुना विडी घरकुल सोलापूर) येथे एका गाडी मध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले बाहेर विक्रीसाठी एका वाहनात भरत आहे. पोलिसांनी ताबडतोब राजर्षी शाहू प्राथमीक विद्यालय (जुना विडी घरकुल सोलापूर) येथे मोर्चा वळविला. पोलिसांची टीम शाळेजवळ एक तिन चाकी पिवळया रंगाची अपे मालवाहतूक ऑटो रिक्षा मध्ये दोन मुले शालेय विदयार्थाचे शासकिय शालेय वितरण प्रणालीतील तांदुळ, मटकीचे पोते, मुगदाळचे पोते, २५ तेल पाकिट असे अन्नधान्य भरुन घेवुन जात असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी चौकशी करुन सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे येथे आणला. पोलिसांनी चौकशीस सुरुवात केली असता, राजर्षी शाहू प्राथमीक विद्यालय (जुना विडी घरकुल सोलापूर) या शाळेतील विदयार्थाचे पोषण आहार आहे. शाळेतील मुख्याध्यापीका महानंदा सोलापूरे यानी आम्हांस फोन करुन बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या आदेशानुसार शाळेच्या आवारातील अन्नधान्य घेवून जावा व मार्केट यार्ड सोलापूर येथील सोहेल कलबुर्गी याच्याकडे विक्री करा असे सांगून ३०० रुपये मजुरी दिली अशी माहिती मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी दिली.

एमआयडीसी पोलिसांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गतअसलेल्या अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली. अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराची चौकशी करून पंचनामा केला आणि पोलिसांना अहवाल सादर केला.त्या अहवालावरून पोलिसांनी राजर्षी शाहू शाळेचे संस्थाचालक व माजी महापौर मनोहर सपाटे, मुख्याध्यापिका महानंदा सोलापूरे आणि शासकीय अन्नधान्याचा काळाबाजार करणारा सोहेल कलबुर्गी यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR