21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयआमचे लष्करी शस्त्रे परत करा

आमचे लष्करी शस्त्रे परत करा

मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू होते. आता रशियाने पाकिस्तानच्या अडचणीत वाढ केली आहे. युक्रेनसोबत दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे रशियाही कठीण परिस्थितीत आहे. त्यामुळेच कठीण परिस्थितीने वेढलेल्या रशियाने आता आपला तणाव कमी करून लष्करी शस्त्रे परत मिळवण्याच्या प्रयत्न आपल्या पूर्वीच्या संरक्षण सहयोगी देशांकडे मोर्चा वळवला आहे.

आपली लष्करी शस्त्रे परत मिळवण्यासाठी रशियाने पाकिस्तानकडे मोर्चा वळविला आहे, जो अनेक वर्षांपासून रशियन लष्करी उपकरणे खरेदी करत आहे. रशियाने पाकिस्तानला त्यांच्या हेलिकॉप्टरचे इंजिन परत करण्यास सांगितले आहे. रशियाने पाकिस्तानला त्यांचे हेलिकॉप्टर इंजिन परत करण्यास सांगणे हे सूचित करते की, रशियाला त्याच्या लष्करी प्रयत्नांमध्ये त्वरित मदतीची आवश्यकता आहे, जे आंतरराष्ट्रीय लष्करी युती आणि संरक्षण उद्योगावरील संघर्षाचे व्यापक परिणाम दर्शवते. युक्रेन युद्धाचा हवाला देत रशियाने पाकिस्तानकडून ही मागणी केली आहे. रशियाने इजिप्त आणि बेलारूस सारख्या इतर देशांना त्यांच्या सशस्त्र दलांना त्यांच्याकडे आधीपासूनच वापरात असलेल्या उपकरणांसह मदत करण्याच्या प्रयत्नात अशाच विनंत्या केल्या आहेत, असे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

पाकने वृत्त फेटाळले
एका अहवालानुसार, रशियाने इस्लामाबादला हेलिकॉप्टर इंजिन परत करण्यास सांगितले आहे. हे एमआय-३५एम हेलिकॉप्टरसाठी आवश्यक भाग आहेत, याचा वापर रशिया युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर करत आहे. प्रदीर्घ काळ सुरू असलेले युद्ध पाहता खबरदारीचा उपाय म्हणून रशियाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. मात्र, रशियाने ही मागणी केल्याचे किंवा पाकिस्तानशी संपर्क साधल्याचे वृत्त पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR