17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरतापमानाचा कहर, दुचाकीचा कोळसा 

तापमानाचा कहर, दुचाकीचा कोळसा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर व परिसराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी तापमानाचा पारा ३९ अंशसेल्सिअसपेक्षास्त होता. सूर्य आग ओकत होता. त्यामुळे येथील जिल्हा न्यायालयासमोरी रोडवर एम. एच. २४, बीई ०८४५ या क्रमांकाची दुचाकी जळून कोळसा झाली. चालत्या दुचाकीतून धुर निघाला आणि पाहता पाहता दुचाकी आगीच्या लोळात जळून खाक झाली.
सध्या सूर्य आग ओकत असल्यामुळे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तापमानाने चाळीसी घाठली आहे. एप्रिल, मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी सूर्योदयापासूनच उन्हाचा तडाखा सुरु होतो. दुपारी उन्हाच्या झळांनी जीव कासावीस होत आहे. यंदा मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात ३८ अंशाच्या पुढे तापमान सरकण्यास सूरुवात झाली. ३० मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. ज्ञानेश्वर सूर्यवंश दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महात्मा गांधी चौकाकडे सदर दुचाकीवरुन निघाले होते. चालत्या दुचाकीतून धुर निघत असल्याचे कोणीतरी सूर्यवंशी यांच्या लक्षात आणुन दिले. त्यांनी तत्काळ दुकचाी रस्त्याकडेला घेऊन थांबवी. पाहता पाहता दुचाकी जळून खाक झाली असून अग्निशन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून दुचाकीला लागलेली आग आटोेक्यात आणली परंतू, तोपर्यंत दुचाकी पुर्णत: जळून भस्म झाली  होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR