मुंबई : मुंब-यातील शिवसेनेच्या शाखेचा हायहोल्टेज ड्रामा शनिवारी संध्याकाळी उभ्या महाराष्ट्राने पाहिला. काल दुपारपासूनच या वादाचे पडसाद ठाणे आणि मुंबईत दिसत होते. ऐन दिवाळीत पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शाखेच्या ठिकाणी गर्दी केली होती. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पण किल्ला लढवला. यामध्ये पोलिसांची शिष्टाई कामाला आली. मोठा वाद झाला नाही. आता या वादावर उद्धव ठाकरे गट कायदेशीर सामना करण्याच्या तयारीत आहे. शाखेचा वाद लवकरच हायकोर्टात पोहचणार आहे. ठाकरे गट याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
भांडणाचे निमित्त ठरली ती मुब््रयातील शिवसेनेची शाखा. गेल्या आठवड्यात मुब््रयातील शिवसेनेची शाखा अतिक्रमणाच्या आरोपाखाली पाडण्यात आली. त्यानंतर शनिवारी उद्धव ठाकरे मुब््रयात आले. शाखा पाडल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी आपण मुब््रयाला शाखेची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना मुब््रयात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावली.
उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौ-याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर प्रचंड दबाव होता. उद्धव ठाकरेंना शाखा परिसरात येण्यास मनाई केल्याने वाद चिघळला. उद्धन ठाकरेंना कलम १४४ ची नोटीस बजावण्यात आली आणि थोड्याच वेळात पोलिसांनी ही नोटीस मागे घेतली. उद्धव ठाकरे शनिवारी संध्याकाळी मुंब-यात दाखल झाले.
मुंब-याला छावणीचे स्वरूप
या दौ-याच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळावा यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली. मुब््रयात ५०० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. संपूर्ण मुंब्रा शहराला छावणीचे स्वरूप आले होते. दोन्ही गटांचे कार्यकर्ते जमल्यानंतर वातावरण अधिकच स्फोटक झाले. त्यात उद्धव ठाकरे शाखा परिसरात आल्यानंतर सर्वांचीच धाकधूक वाढली होती.