27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयअरविंद केजरीवालांची तुरुंगात हळुहळू हत्या केली जातेय

अरविंद केजरीवालांची तुरुंगात हळुहळू हत्या केली जातेय

सौरभ भारद्वाज यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी मोठे विधान केले असून पत्रकार परिषदेत ते म्हणाले की मी दिल्लीतील जनतेला हा प्रश्न विचारत आहे की, जे तुरुंग प्रशासन मधुमेहाच्या रुग्णाला इन्सुलिन देण्यास तयार नाही, त्यांच्याविरोधात दररोज बातम्या लावत आहेत, तुम्ही याच्या बाजूने आहात का? तुरुंग प्रशासनावर विश्वास ठेवता येईल का?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या डॉक्टरांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग देखील करू शकत नाहीत. तुरुंग प्रशासन मुख्यमंत्र्यांना इन्सुलिनची सुईही द्यायला तयार नाही असे आपच्या सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगत आहेत की, मला इन्सुलिनचे इंजेक्शन हवे आहे. असे असूनही तुरुंग प्रशासन, एलजी आणि भाजपाचे लोक नाही म्हणतात आणि त्यांना सुई देण्याची गरज नाही असे सांगतात.

अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्यांना कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो की, साहेब माझी इन्सुलिनची पातळी वाढत आहे. त्यांच्याविरोधात बातम्या पेरल्या जात आहेत. मला वाटत आहे की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत आहेत. तुरुंगात त्यांची हळूहळू हत्या होत आहे. भाजप मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत दररोज खोटी विधान करत आहे असे देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR