मुंबई : विश्वचषक सामन्याच्या उपांत्यफेरीत भारतीय संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सामन्या दरम्यान मोहम्मद शमीने सर्वाधिक ७ बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला १-१ विकेट मिळाली.
विश्वचषक सामन्यांमधील शमीच्या विकेटचे अर्धशतक पूर्ण
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषकाच्या आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने जबरदस्त गोलंदाजी करत एकूण सात बळी घेतले. त्याने त्याच्या संपूर्ण कार्यकाळात विश्वचषकात एकूण ५४ बळी घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे इतक्या विकेट घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच शमीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रमही मोडला.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
ग्लेन मॅकग्राथ (ऑस्ट्रेलिया) – ७१
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ६८
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – ५९
लसिथ मलिंगा (श्रीलंका) – ५६
वसीम अक्रम (पाकिस्तान) – ५५
मोहम्मद शमी (भारत) – ५४
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – ५३