30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराणे जो टोप घालतात त्याचेही केस पिकलेत : संजय राऊत

राणे जो टोप घालतात त्याचेही केस पिकलेत : संजय राऊत

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग दौ-यावर येणा-या उद्धव ठाकरे यांना भाजप नेते आणि लोकसभा निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार नारायण राणे यांनी दौ-याला येण्यापूर्वीच मोठे आव्हान दिले आहे. येणा-या सिंधुदुर्ग दौ-यात असे शब्द बोलून दाखव, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो. आमच्या नेत्यांवर टीका चालणार नाही, असे म्हणत नारायण राणेंनी एकेरी उल्लेख करत टीका केली.

अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला, कोकणाला काय दिले? असा सवाल करत नारायण राणेंनी ठाकरेंवर सडकून टीका केली. नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले. ‘नारायण राणे यांचे आता वय झालंय, नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत. असे म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर पलटवार केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR