26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरतात : श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरतात : श्रीकांत शिंदे

कोल्हापूर: कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही. मग ती नगरपालिका, महापालिका, विधानसभा असो किंवा लोकसभा. त्यासाठी कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरायचे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाची पध्दत आहे.

त्यामुळेच ठाणे आणि परिसरावर इतके वर्षे युती, महायुतीचे वर्चस्व आहे. याच भूमिकेतून आपल्याला ज्यांनी बळ दिले अशा लोकसभा उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. याबद्दल कोणी काही आरोप केले तर त्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत नसल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिंदे यांच्या या मुक्कामावर आमदार सतेज पाटील यांनी टीका केली होती. शिंदे म्हणाले, कोल्हापूरवर आम्ही निवडणुकीपुरते प्रेम करणारे नाही. महापूर, कोरोनामध्येही एकनाथ शिंदे यांनी इथे तळ ठोकला होता. येथे फुटबॉल अकादमीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम सुरू होईल. पावनंिखड मार्गावर मुक्कामाच्या सुविधा निर्माण करण्याची शिवभक्तांची मागणी होती. गेली अनेक वर्षे याकडे कोणी लक्ष दिले नाही. परंतू आता या कामाला सुरूवात होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR