31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयपिता-पुत्राचा प्रताप

पिता-पुत्राचा प्रताप

हसन : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हसनचा खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला असून महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. नागलक्ष्मी यांच्या पत्रानंतर कर्नाटक सरकारने रविवारी या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन केले आहे.

दरम्यान, पीडित महिला रेवण्णा कुटुंबाची नातेवाईक आहे आणि ती त्यांच्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम करत होती. तिने आरोप केला आहे की, पिता-पुत्राने सतत चार वर्षे आपले लैंगिक शोषण केले असे पीडितेने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. पीडितेने एचडी रेवन्ना आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR