28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाफायनल सामन्याला पंतप्रधान मोदींसह अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार

फायनल सामन्याला पंतप्रधान मोदींसह अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्स उपस्थित राहणार

अहमदाबाद : विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी अहमदाबादेत रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १९ नोव्हेंबरला हा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी, अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्ससह अनेक सेलिब्रिटीही मैदानावर उपस्थित राहणार आहेत. या महामुकाबल्यासाठी अहमदाबादसह नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झाले आहे. सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

विश्वचषक २०२३ मधील भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला गेला. यानंतर टीम इंडियाने सलग विजयांची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने १० सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली आहे. आता ‘मेन इन ब्लू’ अंतिम विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी २५२५धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजांनी ८५ विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत भारतीय खेळाडूंचा विश्वचषकातील विक्रम कांगारूंना धडकी भरवणारा आहे. हा सामना पाहण्यासाठी काही खास जण हजेरी लावणार आहेत.

फायनलमध्ये धोनीचीही उपस्थिती
काही खास राजकीय व्यक्ती, उद्योगपती, बॉलिवूड स्टार्स सह, अनेक माजी क्रिकेटपटूही हा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचणार आहे. यातील सर्वात खास व्यक्ती म्हणजे टीम इंडियाचा माजी कणर्धार महेंद्र सिंह धोनी. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादेत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता.

हजेरी लावणा-या दिग्गजांची यादी
पंतप्रधान मोदी,कपिल देव,एम एस धोनी,सचिन तेंडुलकर,अमित शाह,जय शाह,रॉजर बिन्नी,राजीव शुक्ला,अंबानी-अदानी आणि बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी,याव्यतिरिक्त आठ राज्यांचे मुख्यमंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि इतर अनेक दिग्गज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR