न्यूयॉर्क : अमेरिकेतील ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे फेंटानिल नावाच्या ड्रगचे उत्पादन बंद करण्याची मागणी अमेरिकेने केली होती. यानंतर आता चीनने ही मागणी मान्य करत याचे उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. या ड्रगमुळे अमेरिकेत गेल्या वर्षात तब्बल ७० हजार जणांचा बळी गेला होता.
फेंटानिल हे एक सिंथेटिक ड्रग आहे. यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे ६१९ जणांचा बळी गेला आहे. या ड्रगला चायना टाऊन, चायना व्हाईट अशा नावांनी देखील ओळखले जाते. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एपीसीई परिषदेमध्ये बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली होती. अमेरिकेत ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणाने फेंटानिल नावाच्या ड्रगचे उत्पादन रोखण्याची मागणी अमेरिकेने केली होती. यानंतर चीनने ही मागणी मान्य करत फेंटानिलचे उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
या ड्रगमुळे अमेरिकेत मागील वर्षात तब्बल ७० हजार जणांचा बळी गेला होता. फेंटानिल एक सिंथेटिक ड्रग आहे. यंदा एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरात या ड्रगमुळे ६१९ जणांचा बळी गेला आहे. याला चायना टाऊन, चायना व्हाईट अशा नावांनी ओळखले जाते. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एपीसीए परिषदेत बायडेन व जिनपिंग यांच्यात याबाबत चर्चा झाली होती. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिलचा १९९८ साली अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने पेनकिलर म्हणून वापर सुरू केला होता.
सोबतच कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी याचा वापर होतो. फेंटानिल मॉर्फिनपेक्षा १०० पटींनी तर हेरॉइनपेक्षा ५० पटींनी अधिक प्रभावी आहे. फेंटानिलचा वापर दुसरीकडे ड्रग म्हणूनही होतो आहे. याच्या अतिसेवनाने अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातो. फेंटानिल लिक्विड, पावडर, गोळ्या, आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रुपातही उपलब्ध होत असल्याने त्याचा तस्करी व वापर हा चिंतेचा विषय बनला आहे.
औषध म्हणून सुरुवात
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिल हे एक सिंथेटिक ओपिऑईड आहे. १९९८ साली अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याचा पेनकिलर म्हणून वापर सुरू केला होता. यासोबतच कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. फेंटानिल हे मॉर्फिनपेक्षा १०० पटींनी तर हेरॉइनपेक्षा ५० पटींनी अधिक प्रभावी आहे.
ड्रग म्हणून वापर
याच फेंटानिलचा वापर दुसरीकडे ड्रग म्हणूनही केला जातो आहे. याच्या अतिसेवनाने अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातो. फेंटानिल हे लिक्विड, पावडर आणि गोळ्यांच्या स्वरुपात देखील उपलब्ध होते. आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रुपातही हे उपलब्ध होते. त्यामुळेच याची तस्करी आणि वापर हा चिंतेचा विषय बनला आहे.