24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयहेमंत सोरेन यांना सर्वोच्च धक्का

हेमंत सोरेन यांना सर्वोच्च धक्का

निवडणुकीसाठी जामीन देण्यास न्यायालयाने दिला नकार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन अर्ज दाखल करणारे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. हेमंत सोरेन सध्या जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. निवडणुकीत पक्ष आणि उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर आज माननीय न्यायालयाने सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला.

हेमंत सोरेनच्या अंतरिम जामीन याचिकेवर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. एवढेच नाही तर या प्रकरणात नियमित जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. अशा स्थितीत तुमच्या अटकेला आव्हान देणा-या याचिकेत ऐकण्यासारखे ठोस असे काहीच नाही. यासोबतच न्यायालयाने सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांना सांगितले की, तुमच्या पक्षकाराच्या याचिकेत अनेक तथ्ये लपवण्यात आली आहेत. यामुळे तुमच्या याचिकेच्या गुणवत्तेचा विचार न करता अटकेविरोधातील याचिका फेटाळून लावू, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. यानंतर सिब्बल यांनी अंतरिम जामिनाचा अर्ज मागे घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR