17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

आरोपीच्या वडिलाला तीन दिवसांची पोलिस कोठडी अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी बाल न्याय मंडळाचा मोठा निर्णय

पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची आता बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. अटक झाल्यानंतर त्याला १५ तासांमध्येच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला असून अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असेही बाल न्याय मंडळाने म्हटले आहे.

बुधवारी सकाळी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केले. त्यावेळी युक्तीवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारु प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेले ४८ हजार रुपयांचे बीलही कोर्टासमोर सादर केले. तर तिकडे बचावपक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायलयाने आदेश दिला. हा मुलगा अल्पवयीन असल्याचे आरोपीच्या वतीने युक्तीवाद केला. तर या आरोपीने केलेले कृत्य हे अत्यंत भीषण असे आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली.

पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर १८५ कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम ३०४ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरुन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR