27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीकरांची पसंती लेकीला?

बारामतीकरांची पसंती लेकीला?

पोलमध्ये धक्कादायक निकाल समोर

बारामती : प्रतिनिधी
देशातील लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मतदान झाल्यावर देशभरातील निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामधील राज्यासह देशाचे लक्ष लागून असलेल्या हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून चकित करणारी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. अनेक ठिकाणच्या एक्झिट पोलमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचे चित्र दर्शविले गेले आहे. राज्यात पाच जागा लढवणा-या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असे पोलमध्ये दाखवले आहे.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने होत्या. पवारांच्या घरातील सदस्य प्रथमच खासदारकीला एकमेकांविरोधात उभे होते. मात्र काही टीव्ही चॅनल्सच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला सर्वाधिक २५ जागा तर महायुतीला २२ जागा मिळतील. महायुतीच्या २२ जागांमध्ये भाजपला सर्वाधिक १८, त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४ जागा मिळणार असल्याचे दाखवले आहे. मात्र पाच जागा लढवणा-या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचे पोलमध्ये दाखवले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी हे धक्कादायक आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजय मिळवणार असल्याचे दाखवत आहे.

मविआमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक १४, काँग्रेस ५ आणि शरद पवार गटाला ६ जागा मिळणार असल्याचे पोलमध्ये सांगण्यात आले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीमध्ये असूनही त्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही. कारण बंड करत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही आपली जादू दाखवता आली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR