26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्याकंगना रनौत मंडीत ३६ हजार मतांनी पुढे

कंगना रनौत मंडीत ३६ हजार मतांनी पुढे

मंडी : बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ अर्थात कंगना रनौत हिने भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

मंडीमध्ये एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत होती. तर दुसरीकडे तिच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. १ जून २०२४ रोजी ही निवडणूक पार पडली.

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. आता या दोन्ही पक्षांतील दोन तरुण चेहरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले. कंगना रनौत गेल्या एका दशकापासून बॉलिवूडमध्ये हिंदुत्वाचा प्रचार करताना दिसून आली. त्यामुळे ‘पंगाक्वीन’ अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह हाडाचा राजकारणी आहे. तर दुसरीकडे विक्रमादित्य सिंह यांचे आई-वडील दोघेही हिमाचल प्रदेशातील राजकारणात सक्रीय आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR