24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलकांवरील लाठीचार्जप्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जप्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष

जालना : अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहींकडून करण्यात येत होता. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समूदायाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु होते. यावेळी कथितरित्या आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे राज्यभरातून संतापाची लाट निर्माण झाली. लाठीचार्जचा आदेश देणारे पोलिस आणि सरकारमधील मंत्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरली होती. त्यानंतर सरकारकडून काही पोलिस अधिका-यांवर कारवाई करण्यात आली होती.

या सर्व घटनेमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते, असे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.

मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर टीका होऊ लागल्याने त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. लाठीचार्ज व्हायला नको होता, असे ते म्हणाले होते. लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला होता, असे फडणवीस म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR