23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातून ७ रणरागिणी जाणार लोकसभेत

राज्यातून ७ रणरागिणी जाणार लोकसभेत

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल मंगळवारी, ४ जूनला जाहीर करण्यात आला. या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आले. ‘चारसौ पार’चा नारा देणा-या भाजपाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महिला उमेदवारांनी चांगलीच बाजी मारली आहे. राज्यातून ७ महिला उमेदवारांनी आपल्या विरोधकांशी काँटे की टक्कर देत विजयश्री आपल्याकडे खेचून आणली. या ७ जणी आता लोकसभेत राज्याचे नेतृत्व करणार आहेत.

बारामतीत नणंद ठरली वरचढ : अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत भावजय असलेल्या सुनेत्रा पवार यांनी नणंद सुप्रिया सुळे यांच्यावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही काका शरद पवार विरुद्ध पुतण्या अजित पवार अशीच रंगली.

प्रतिभा धानोरकरांनी मारली बाजी : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसने राज्यात एकमेव असलेला खासदार गमावला होता. विजय वडेट्टीवार यांच्यासारखा पक्षांतर्गत विरोधक असतानाही प्रतिभा धानोरकर यांनी एकेकाळचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत केले. त्यांच्या या विजयाने काँग्रेसला राज्यात मोठे बळ मिळाले आहे.

मुंबईत वर्षा गायकवाड : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्षाची मुंबईत धुरा सांभाळताना भाजपाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांची सुरुवातीच्या फेरीपासून पीछेहाट झाली होती. मात्र अखेरच्या काही फे-यांमध्ये ५६ हजार मतांची लीड तोडून उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.

धुळ्यातून शोभा बच्छाव : धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्यावर विजय मिळवला. विशेष म्हणजे धुळ्यात भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान यांच्यात तिरंगी लढत झाली.

जळगाव आणि रावेर मतदारसंघ भाजपने राखले
रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांनी अगोदरपासूनच आघाडी घेतली होती. या दोन्ही महिला उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना रोखले. रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी हॅट्ट्रिक करत श्रीराम पवार यांचा पराभव केला.

सोलापूरमधून प्रणिती शिंदे : सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी विजयी पताका फडकावली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राम सातपुते यांच्यासाठी सभा घेतली होती. मात्र तरीही सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवल्याने हा महाविकास आघाडीसाठी मोठा विजय ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR