24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयभारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर झाल्याच्या बातम्या खोट्या : काँग्रेस

भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर झाल्याच्या बातम्या खोट्या : काँग्रेस

नवी दिल्ली : भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला असल्याच्या केंद्रीय मंत्र्यांच्या या दाव्यावर काँग्रेसने पलटवार केला आहे. भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच काँग्रेसने भाजपवर हेडलाइन मॅनेजमेंटचा आरोप केला आहे. भाजपवर टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले की, उत्साह निर्माण करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काही केंद्रीय मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ‘बनावट’ दावे केले आहेत. रविवारी दुपारी २:४५ ते ६:४५ दरम्यान, देश जेंव्हा क्रिकेट सामना पाहण्यात व्यस्त होता, तेंव्हा मोदींचे ढोल वाजवणारे अनेक नेते आणि उद्योगपतींनी भारताचा जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर झाल्याचा दावा केला.

जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या जीडीपीवर दावे करणाऱ्या नेत्यांमध्ये राजस्थान आणि तेलंगणाचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील होते. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव न घेता ते म्हणाले की, नेते आणि मंत्र्यांसह ‘पंतप्रधानांचे सर्वात आवडते उद्योगपती’ यांनीही ४ ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचे दावे केले. खळबळ माजवण्याच्या उद्देशाने ही पूर्णपणे खोटी बातमी होती. रमेश यांनी आरोप केला की, अर्थव्यवस्था आणि जीडीपीबद्दलचे खोटे दावे हे बेफिकीरपणा आणि हेडलाइन व्यवस्थापनाचा दयनीय प्रयत्न आहेत.

भाजप नेत्यांनी खोट्या बातम्या दिल्या?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गतिमान, दूरदर्शी नेतृत्व असे दिसते! सुंदर प्रगती करत असलेला आपला नवीन भारत असाच दिसतो. त्यांनी एक फोटो पोस्ट केली आणि म्हणाले की, आपल्या देशाच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR