24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयभाजपच्या आयटी सेल प्रमुखांवर लैंगिक शोषणाचे आरोप

भाजपच्या आयटी सेल प्रमुखांवर लैंगिक शोषणाचे आरोप

नवी दिल्ली : भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगालचे प्रभारी अमित मालवीय यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या भाजपच्या नेत्याने अमित मालवीय यांच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप गंभीर असून अमित मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष असल्याने पक्षाने या आरोपांची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे असे श्रीनेत म्हणाल्या. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करावी आणि तोपर्यंत अमित मालवीय यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी. भाजपने नेहमीच महिलांचे शोषण करणा-यांचे संरक्षण केले आहे. परंतु हे आरोप आता पक्षातील नेत्यानीच केल्याने या आरोपांचे गांभीर्य वाढल्याने पक्षाच्या नेत्यांनी त्वरित मालवीय यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे श्रीनेत यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR