पाथरी : पाथरी-मानवत आणि सोनपेठ विधानसभा मतदार संघ अंतर्गत येणा-या ग्रामीण भागातील गावाचा शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान, महाराष्ट्र प्रदेश सचिव असेफ खान, शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर, शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठलराव रासवे आणि पदाधिका-यांचे ग्रामीण भागात गावोगावी शिवसेना पक्ष मजबुती व वाढीसाठी झंजावती दौरे सुरु करण्यात आले आहे. या दैनंदिन दौ-याना मोठा सकारात्मक प्रतिसाद गावक-यांच्या वतीने मिळत असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावात सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध योजनेअंतर्गत विकास कामांचे उद्घाटन होत असल्याने लोकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे. कोणत्याही वैधानिक पदावर नसताना गावाचा विकास करणारे नेतृत्व विधानसभेवर पाठवल्यास यापेक्षा दुपटीने ग्रामीण भागाचा कायापालट होईल या आशेने प्रत्येक गावातील लोक सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे. यामुळे शिवसेना पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.