हाथरस : काँग्रेस खासदार-विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज हाथरस चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राहुल गांधी दिल्लीहून पहाटे अलिगडमधील पिलखाना येथे पोहोचले. येथे त्यांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर ते हातरसमधील नवीपूर खुर्द, विभव नगर येथील ग्रीन पार्क येथे जाऊन ते आशा देवी, मुन्नी देवी आणि ओमवती यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
या दुर्घटनेतील शोकग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, हा एक दु:खद अपघात आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुघर्टनेत प्रशासनाकडून खुप खुका झाल्या असून पीडित कुटुंबांना योग्य मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी विनंती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना करतो असेही विरोधी पक्षनेते राहुल गांधीं म्हणाले. हाथरस दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. यासोबतच मुख्य आयोजकावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ज्या लोकांना आरोपी बनवले आहे त्यापैकी राम लदैत यादव, मंजू यादव, उपेंद्र सिंह यादव, मंजू देवी यादव, मेघ सिंह आणि मुकेश कुमार यांना अटक करण्यात आली तर मुख्य सूत्रधार देव प्रकाश मधुकर याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.