23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeअंतरराष्ट्रीयरशियाच्या विनाशकारी हल्ल्याने युक्रेन हादरले

रशियाच्या विनाशकारी हल्ल्याने युक्रेन हादरले

१७ प्रदेश, १८८ ड्रोनचा वापर

ओडेसा : रशियाच्या ड्रोन्सनी युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवला आहे. युक्रेनच्या १७ प्रदेशांना टार्गेट करून १८८ ड्रोन्स डागण्यात आले. अमेरिकेत सत्ता बदल होईपर्यंत अजून काही दिवस हे युद्ध चालेल अशी शक्यता आहे. दिवसेंदिवस ही लढाई अजून घनघोर स्वरुप धारण करत चालली आहे.

रशियाच्या ड्रोन हल्ल्याने युक्रेनमध्ये मोठा विध्वंस घडवून आणला आहे. रशियाने मध्यरात्री युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला. युक्रेनच्या १७ भागांमध्ये १८८ ड्रोन्सने हल्ला केला. रशियाचे बहुतांश ड्रोन्स इंटरसेप्ट करण्यात आले, असा युक्रेन डिफेंस फोर्सचा दावा आहे. रशियाने पोर्ट सिटी ओडेसा ते खारकीवपर्यंत ड्रोन हल्ले केले. युक्रेनच मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर आणि ऑईल फॅसिलिटीवर बहुतांश हल्ले केले. रशियाच्या ड्रोन हल्ल्यात युक्रेनच मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या हल्ल्याने गोंधळलेल्या युक्रेनने बश्किरियावर मोठा हल्ला केला. रशियाच्या सलावत शहरातील तेल आणि गॅस प्लान्टवर सुसाइड ड्रोनद्वारे हल्ले केले.

रशियाच्या बश्कोर्तोस्तान भागात युक्रेनने ड्रोनद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युक्रेनी ड्रोन ऑईल रिफायनरीच्या जवळ येताच रशियन डिफेन्स सिस्टिमने प्रतिहल्ला चढवला, असा रशियन लष्कराने दावा केला आहे. युक्रेनचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला असे रशियाने म्हटले आहे. रशियाच्या वोरोनिशला युक्रेनच्या हल्ल्याची झळ बसली. बॉर्डरपासून २५० किलोमीटर आत युक्रेनने ड्रोनद्वारे विनाशकारी हल्ले केले. जोरदार स्फोटानंतर अनेक इमारतींमध्ये आगी लागल्या.

शेकडो कत्यूषा रॉकेट्स डागले
लॉन्ग रेंज मिसाइलचा धाक दाखवणा-या युक्रेनने बेलगोरोदला टार्गेट केले. यावेळी अनेक भागात स्फोटाचे जोरदार आवाज ऐकू आले. मिसाइल हल्ल्यामुळे मोठ नुकसान झाले. अनेक ठिकाणी आगीच्या ज्वाळा दिसल्या. डोनेस्कमध्ये अनेक आघाड्यांवर युद्धा सुरु आहे. यावेळी रशियन सैन्याने युक्रेनी बेसवर मोठा हल्ला केला. रशियाने मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टिमद्वारे एकाचवेळी शेकडो कत्यूषा रॉकेट्स डागले. यामुळे युक्रेनी पोस्टमध्ये एकच पळापळ सुरु झाली.

कुर्स्कमध्ये घणघोर लढाई
युक्रेनी सैन्याने कुर्स्कमध्ये रशियन ठिकाणांवर फ्रान्सकडून मिळालेल्या एएएसएम-२५० हॅमरने हल्ले केले. एअर-टू-सरफेस मिसाइल हल्ल्यात रशियन ठिकाण उद्धवस्त करण्याचा व्हीडीओ युक्रेनने जारी केला आहे. कुर्स्कमध्ये अनेक आघाड्यांवर रशिया आणि युक्रेनमध्ये आमने-सामनेची लढाई सुरु आहे. ट्रेंचमध्ये लपलेल्या युक्रेनी सैनिकांवर रशियन सैनिकांनी अचानक हल्ला केला. रशियाच्या शेलिंगमध्ये २० पेक्षा जास्त युक्रेनी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR